
''ऋणानुबंध''च्या सदस्यांचा पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश
खळद, ता. २८ : पुरंदर तालुक्यात श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यावर ''ऋणानुबंध''च्या सदस्यांनी पथनाट्य सादर करत समाजप्रबोधन केले.
सासवडला पालखी मैदानावर पथनाट्य करत स्वच्छतेचा संदेश दिला. प्लास्टिक टाळण्यासाठी घोषणाही देण्यात आल्या. तसेच व्यसनमुक्ती करण्यासाठी समाज प्रबोधन करण्यात आले.
दिंडीबरोबरच ऋणानुबंधच्या सदस्यांनी सासवडला पालखी मैदानावर पथनाट्य करत स्वच्छतेचा संदेश दिला. पथनाट्य पाहणाऱ्या वारकऱ्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, वाल्हा येथे पालखीचा मुक्काम होता. लाखो भाविक भक्तांनी या पायी दिंडीत सहभाग नोंदवला. पाऊले चालती पंढरीची वाट तसेच अभंग बोलत सर्व वारकरी मंडळी दिंडीसोबत चालत होते.
ऋणानुबंध या सामाजिक संस्थेच्या "स्वच्छ वारी सुंदर वारी" या उपक्रमात सहभाग घेऊन पथनाट्यातून समाज प्रबोधन केले. संस्थेचे सर्वच उपक्रम प्रेरणादायी आणि समाजोपयोगी असतात. या वारीत वारकऱ्यांबरोबर विठू नामाच्या गजरात अभंग म्हणत दंग होता आले, असे मत यावेळी उपस्थित सर्व युवकांनी मांडले. नव्या पिढीला वारीचा अनुभव घेता यावा यासाठी स्वच्छ वारी सुंदर वारी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
01572
Web Title: Todays Latest District Marathi News Kaa22b01042 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..