तांत्रिक बिघाडामुळे नोंदी ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तांत्रिक बिघाडामुळे नोंदी ठप्प
तांत्रिक बिघाडामुळे नोंदी ठप्प

तांत्रिक बिघाडामुळे नोंदी ठप्प

sakal_logo
By

खळद, ता. २६ : संगणक प्रणालीतील दुरुस्तीच्या कारणास्तव पुरंदर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या नोंदी गेले दोन ते तीन महिन्यापासून बंद आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
काही वर्षापासून ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व नोंदी संगणकावरती होत असून नागरिकांना ऑनलाइन दाखले देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. तर घरपट्टी व इतर कर आकारण्याची बिलेही याच पद्धतीने नागरिकांना दिली जातात. मात्र, या यंत्रणेत दुरुस्तीचे काम सुरू आहे व याला मोठ्या प्रमाणात विलंब झाल्यामुळे सध्या ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही प्रकारची नोंद होत नसल्याने सर्व ग्रामपंचायतींचा नवीन वसूलही पूर्णपणे ठप्प झाला आहे. पर्यायाने याचा गावच्या विकास कामांवरही परिणाम होत असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे.

‘‘नवीन घर बांधल्यावर गेले तीन ते चार महिन्यांपासून ग्रामपंचायतीमध्ये घरनोंदीसाठी अर्ज दिला आहे. मात्र, अद्याप नोंदीचा उतारा मिळालेला नाही. याबाबत चौकशी केली असता नोंद मंजूर झाली आहे. परंतु, तांत्रिक अडचण असल्याकारणाने नोंद धरता येत नाही व उताराही देता येत नसल्याचे सांगितले जाते. तर घर नोंदीचा दाखला नसल्याने वीज कनेक्शन व इतर अनेक अडचणी येत आहेत.’’
कैलास शि. कादबाने, शेतकरी, खळद.

‘‘नवीन नोंदीचा अर्ज आला तर मासिक मीटिंगमध्ये आम्ही तो तातडीने मंजूर करतो. मात्र संगणक प्रणालीतील तांत्रिक त्रुटीमुळे नागरिकांना नोंद मंजूर होऊनही दाखला देता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे.’’
-दशरथ कादबाने, सरपंच, खळद.

‘‘गैरसोय पुरंदर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात झाली असून वेबसाइटमध्ये प्रॉब्लेम असल्याने ऑनलाइन डाटा भरता येत नाही, सध्या काही प्रमाणात डाटा भरण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र नोंदी प्रमाणित करणे व आकारणी करणे अद्याप सुरू झाले नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवरती सातत्याने प्रयत्न सुरू आहेत लवकरच हे काम पूर्ण होईल.’’
-अभिजित सोनवणे, व्यवस्थापक, ग्रामपंचायत ऑनलाइन विभाग पुरंदर तालुका.

Web Title: Todays Latest District Marathi News Kaa22b01053 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top