विद्यार्थ्यांना आंब्याचे झाड भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना आंब्याचे झाड भेट
विद्यार्थ्यांना आंब्याचे झाड भेट

विद्यार्थ्यांना आंब्याचे झाड भेट

sakal_logo
By

खळद, ता. १६ : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना वाघडोंगर वृक्ष संवर्धन समिती सासवड यांच्या माध्यमातून गरजू व होतकरू मुलांना त्यांच्या भावी आयुष्यात आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने त्या मुलांना ३ वर्षे वाढविलेले केशर आंब्याचे झाड भेट देण्याचा अनुभव उपक्रम राबविला.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हे झाड त्यांच्या घरी लावावे आणि साधारण दोन वर्षे याची जोपासना केली, तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांना त्यांचे शिक्षण घेताना थोडीफार आर्थिक मदत होईल आणि त्याचबरोबर त्यांना लहानपणापासून वृक्षसंवर्धनाची आवड लागेल, अशी भावना या उपक्रमात असल्याचे संस्थेच्या सदस्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारवळण, यशवंत विद्यालय मावडी, जिजाई सोपानराव जाधव विद्यालय साकुर्डे, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिवरी या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना या झाडांचे वाटप करण्यात आले.
या प्रकल्पात समितीस सत्यवान कुंजीर, डॉ. रमेश खांदे, नितीन जगताप, राजेंद्र कामथे, ओमप्रकाश लिंबोरे, उमेश जाधव, तानाजी सातव, अतुल हतीवलेकर या दात्यांनी मदत केली.

या कार्यक्रमाचे आयोजन वाघ डोंगर वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पायगुडे, अजित ताकवले व अविनाश जाधव यांनी केले.
--------------------
ज्या मुलांना वृक्ष दिले आहेत त्या मुलांना ‘वृक्षमित्र’ म्हणून संबोधले जाणार असून, या झाडांचे संवर्धन व्हावे, यासाठी पाठपुरावा देखील संस्था करणार आहे. भविष्यात या प्रत्येक झाडाला दत्तक घेतलेल्या मुलाच्या नावावरूनच त्या झाडाला ओळखले जाणार आहे. - अविनाश जाधव, वृक्षमित्र
------------

Web Title: Todays Latest District Marathi News Kaa22b01071 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..