सुभाष कामथे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुभाष कामथे यांचे निधन
सुभाष कामथे यांचे निधन

सुभाष कामथे यांचे निधन

sakal_logo
By

खळद, ता. ३ : येथील (ता.पुरंदर) माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष ज्ञानदेव कामथे (वय ७६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. स्वातंत्र्यसैनिक कै. ज्ञानदेव सोपान कामथे यांचे ते पुत्र असल्याने गांधी या नावाने ते परिचित होते. तर दैनिक संध्या, राष्ट्रतेज आदी वर्तमानपत्रांत त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केले होते. येथील स्वस्त धान्य दुकानदार मुक्ताबाई कामथे यांचे ते पती होते तर सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल येथील ज्येष्ठ शिक्षिका पौर्णिमा धावडे यांचे तसेच प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर कामथे व सिद्धेश्वर कामथे यांचे ते वडील होत.
01749