
खळदच्या उपसरपंचपदी छाया कामथे
खळद, ता. २२ : खळद (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया सचिन कामथे यांची बिनविरोध निवड झाली.
उपसरपंच आशा सुरेश रासकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी छाया कामथे व रोहिणी योगेश कामथे यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी रोहिणी कामथे यांनी आपला अर्ज माघार घेतल्याने छाया कामथे यांची उपसरपंच पदी निवड झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच कैलास कामथे, आशा रासकर, भाऊसाहेब कामथे, योगेश कामथे, संदीप यादव, शारदा कामथे, रोहिणी कामथे, नम्रता कादबाने आदी सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर कामथे यांचा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कामथे, माजी उपसरपंच सुदाम कामथे, संजय कामथे, सुरेश रासकर, लक्ष्मण कामथे, विकास कादबाने, पोपट कामथे यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच दशरथ कादबाने यांनी काम पाहिले तर यावेळी ग्रामसेवक सुरेश जगताप यांनी या कामी सहकार्य केले.