Thur, Feb 2, 2023

स्कूलबसच्या धडकेत शेतकरी जखमी
स्कूलबसच्या धडकेत शेतकरी जखमी
Published on : 21 December 2022, 3:25 am
खळद, ता. २१ : खळद (ता. पुरंदर) येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल बसची धडक बसल्याने पोमणनगर येथे येथील शेतकरी जयहिंद पोमण हे जखमी झाले.
याबाबत सासवड पोलिसांनी माहिती दिली की, खळद येथील स्कूल बस सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोमणनगर येथील मोठवस्ती फाटा येथून जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीवरील जयहिंद पोमण यांना धडकली. त्यात पोमण यांच्या पायाच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर व तोंडाला मार लागला. याबाबत विठ्ठल जयहिंद पोमण यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार स्कूल बसच्या चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.