निळूंजला नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

निळूंजला नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

खळद, ता. ७ : निळूंज (ता. पुरंदर) येथील चिल्हावळी वस्ती येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून निळूंज गावातील ग्रामस्थांना प्रत्येक घरात नळाचे कनेक्शन आणि मुबलक पाण्याची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा केला जात होता.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनाचा ५०% निधी व केंद्र शासनाचा ५०% निधी अशा तत्त्वावर निळूंज गावासाठी जवळपास ५० लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेली नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आणि त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. निळूंज गावातील रस्ते, शाळा, अंगणवाड्या व गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश होले यांनी दिले. 
यावेळी माजी सरपंच सीताराम बनकर यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामांचे कौतुक केले तर भविष्यकाळात होणार असलेल्या विकास कामांबद्दल व सर्वांगीण विकासाबद्दल ग्रामपंचायतच्या सरपंच रूपाली जगताप यांनी माहिती दिली.

यावेळी निळूंज ग्रामपंचायतच्या सरपंच रूपाली जगताप, माजी सरपंच विलास बनकर, सीताराम बनकर,सदस्य गणेश होले, रूपाली बनकर, उज्ज्वला बनकर, अश्विनी बनकर, रामचंद्र लडकत, बबन बनकर,अशोक बनकर, नारायण जगताप, मनोज बनकर, ज्ञानदेव शिवरकर, कैलास बनकर, ग्रामसेवक सुरेश जगताप त्यासोबतच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

01804

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com