शिवरी पाणी योजनेसाठी १५ लाखांचा निधी

शिवरी पाणी योजनेसाठी १५ लाखांचा निधी

खळद, ता. ११ : पिलाणवाडी (ता. इंदापूर) जलाशयावरून असणाऱ्या शिवरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार संजय जगताप यांनी टंचाई निधीतून १५ लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती कक्षाचे यांत्रिकी उपअभियंता दयानंद बिराजदार यांनी दिली.
शिवरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पंपातील बिघाडामुळे गेल्या १० ते १५ दिवसांपासून बंद असून, नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल होत आहेत. या ठिकाणी असणारे पंप हे दुरुस्तीच्या क्षमतेच्या पलीकडे गेले आहेत. त्यामुळे येथे नवीन पंप बसवणे गरजेचे होते. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी वारंवार नवीन पंप बसवण्याची मागणी केली आहे. यानुसार उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पुरंदरचे घुबे यांच्या शिफारशीतून आमदार जगताप यांनी टंचाई निधीतून ही तरतूद केली.
दरम्यान, येथील पिण्याच्या पाण्याचे नागरिकांचे होणारे हाल व या योजनेची दुरवस्था याबाबत दैनिक ‘सकाळ’ने १० मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. याचीच दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने शिवरी प्रादेशिक योजनेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपअभियंता दयानंद बिराजदार यांच्यासह ठेकेदार एम. एस. रसाळ, ग्रामसेवक शीतल भुजबळ, पाणीपुरवठा कर्मचारी शिवाजी लिंबोरे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश कामथे व ग्रामस्थ उपस्थित होते.

नवीन पंप मिळणार
या योजनेवर असणारा जुना पंप दुरुस्त करून वापरला जात आहे. मात्र, योजनेवर ताण आल्याने त्याच्यात सतत बिघाड होत असून, दुरुस्त होईल की नाही व दुरुस्त झालास किती काळ टिकेल, हे सांगता येत नाही. सध्या पंधरा ते वीस दिवसांपासून नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत होत असून, आमचे प्रयत्न सुरू असल्याचे ग्रामसेवक शीतल भुजबळ यांनी सांगितले. तर, टंचाईतून नवीन पंपासाठी तरतूद झाल्याने येत्या आठ दिवसांमध्ये या योजनेसाठी ४० अश्‍वशक्ती क्षमतेचा नवीन पंप दिला जाईल, असे बिराजदार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com