खळदच्या सेंट जोसेफ स्कूलची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खळदच्या सेंट जोसेफ स्कूलची बाजी
खळदच्या सेंट जोसेफ स्कूलची बाजी

खळदच्या सेंट जोसेफ स्कूलची बाजी

sakal_logo
By

खळद, ता. १३ : खळद (ता. पुरंदर) येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावी व बारावीचा सीबीएससी बोर्डचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२- २३मध्ये झालेल्या सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेमध्ये ईशा संतोष बोरकर हिने ९६.४ टक्के व हिंदी विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवले. तर ओम सतीश झगडे ९४. ६% व विशाखा राजेंद्र वढणे ९२. ८% गुण मिळवले. तसेच बारावीमध्ये श्रुती सतीश सोनवणे हिने ७५.६ टक्के गुण तर सेजल देविदास गोंडाले ६५%, स्मृती राजकुमार बुरडे ६३.६%गुण मिळवले.
दहावीचे आठ विद्यार्थी हे ९०%च्या वर गुण मिळवण्याचे मानकरी ठरले आहेत. तर ८० टक्केच्या पुढे गुण मिळवून २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेच्या निकालाची परंपरा राखण्यासाठी शाळा सतत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन करत असल्याचे शाळेचे डायरेक्टर नेल्सन पिंटो यांनी सांगितले. याप्रसंगी व्यवस्थापिका सिस्टर एलियमा, प्राचार्य अनुराधा पोरे, उपप्राचार्य महेश भालेराव, सर्व शिक्षक वृंद व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.