शिक्षक, मित्रांना भेटून कंठ आला दाटून

शिक्षक, मित्रांना भेटून कंठ आला दाटून

खळद ता. १३ : बेलसर (ता.पुरंदर) येथील बालसिद्धनाथ विद्यालय बेलसरच्या १९७३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. तब्बल पन्नास वर्षानंतर जुने मित्र व मैत्रिणी भेटल्यानंतर सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला. तत्कालीन शिक्षक व आठवणींना उजाळा देत सर्वच उपस्थितांना कंठ दाटून आला होता.
माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे व्यक्ती, अनेक शिक्षक, राजकारणी, गृहिणी, प्रगतशील शेतकरी त्यासोबतच इतर प्रभावित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती घडल्या आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक विजय रासकर यांनी केले होते. त्यावेळच्या दहावीच्या परीक्षेत ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. ते आता सर्व सेवानिवृत्त झाले आहेत. आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करून त्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये ठसा उमटवला आहे. पुढील ५१ व्या वर्षी बालसिद्धनाथ विद्यालय बेलसर या ठिकाणी भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्याचे यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
स्नेहमेळाव्यास विठ्ठल गरुड, राघू जगताप, दिलीप कुदळे, भालचंद्र जगताप, अशोक शहा, विजय रासकर, बाळासाहेब जगताप, विलास जगताप, दत्तात्रेय जगताप, चंद्रकांत जगताप, आबासाहेब गरुड, रामदास जगताप, साधू जगताप, प्रकाश भोईटे, भगवान गरुड, तारका शिंदे, शालन जगताप, विजया लव्हे, प्रमिला चौरे, यमुना दरवडे, विमल गायकवाड, गंगू जगताप, विमल कुदळे हे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

01949

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com