खळद येथे दूमदुमला शिवरायांचा जयघोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खळद येथे दूमदुमला शिवरायांचा जयघोष
खळद येथे दूमदुमला शिवरायांचा जयघोष

खळद येथे दूमदुमला शिवरायांचा जयघोष

sakal_logo
By

खळद, ता. ६ : खळद (ता.पुरंदर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमिपुत्रांच्या दिनाचे महत्त्व दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले होते. यानुसार खळद ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर स्वराज्याची गुढी उभारण्यात आली होती.
यावेळी सरपंच दशरथ कादबाने, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कामथे, योगेश कामथे, माजी उपसरपंच सुदाम कामथे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी महादेव जाधव, सोसायटीचे संचालक जयराम इभाड, प्रकाश जाधव, जयसिंग कामथे, संतोष कामथे, दत्तात्रेय कामथे, ज्योतिराम कामथे, शरद इभाड, नारायण इंगळे, कैलास खळदकर, संभाजी कामथे, नाना भांडवलकर,आशाताई आबनावे आदी उपस्थित होते.

01982