कडूस सोसायटीवर भगवा फडकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडूस सोसायटीवर भगवा फडकला
कडूस सोसायटीवर भगवा फडकला

कडूस सोसायटीवर भगवा फडकला

sakal_logo
By

कडूस, ता. ५ : कडूस (ता. खेड) विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या श्री भैरवनाथ शेतकरी सहकार परिवर्तन पॅनेलने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्री भैरवनाथ शेतकरी सहकारी पॅनेलवर सात विरुद्ध सहा, अशी मात करून सोसायटीच्या स्थापनेपासूनची राष्ट्रवादीची सत्ता मोडीत काढली. या निवडणुकीत मतदारांनी तरुण व नवीन चेहऱ्यांना संधी दिली.
कडूस विविध कार्यकारी सोसायटी ही खेड तालुक्यातील सर्वात मोठी व अग्रगण्य समजली जाते. गेल्याच वर्षी सोसायटीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली. कडूस व कडूसच्या बारा वाड्यावस्त्या, गारगोटवाडी व रानमळा गावचे मिळून सोसायटीचे एकूण तीन हजार शेतकरी सभासद आहेत. सन २०२२-२७ या पंचवार्षिकसाठी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय घनवट यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ शेतकरी सहकार परिवर्तन पॅनेल व उद्योजक अभिनाथ शेंडे व सरपंच निवृत्ती नेहेरे यांच्या नेतृत्वाखालील श्री भैरवनाथ शेतकरी सहकारी पॅनेलमध्ये निवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली.

झेडपी निवडणुकीची रंगीत तालीम
दोन्ही पॅनेलने प्रचारासाठी ध्वनिक्षेपक (भोंगा) लावलेल्या वाहनांचा वापर, वाड्यावस्त्यांवर प्रचाराच्या रॅली, कोपरा सभा, प्लेक्स-बॅनरबाजी, दररोज वेगवेगळ्या वस्त्यांवर जेवणावळीच्या पंगती, दारू व पैशांचा वापर केल्यामुळे ही निवडणूक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम ठरली. यात शिवसेनेच्या पॅनेलने बहुमत खेचून आणले. सुरवातीस एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत शिवसेनेला सात; तर राष्ट्रवादीला सहा जागा मिळाल्या. सर्वसामान्य कर्जदार गटात आठपैकी शिवसेनेला पाच, तर राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या. निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावणारे शंकर कावडे व विजयाची हॅट्ट्रिक साधणारे माजी अध्यक्ष पंडित मोढवे या दोघांना सर्वाधिक मते मिळाली.

विजयी उमेदवार
सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी- शंकर रघुनाथ कावडे, अतुल ज्ञानेश्वर गारगोटे, अशोक दगडू गारगोटे, राहुल कुंडलिक गारगोटे, राजेंद्र विष्णू ढमाले, पंडित गेनभाऊ नेहेरे, अशोक दामोदर बंदावणे, पंडित लक्ष्मण मोढवे. महिला राखीव- रोहिणी नवनाथ काळोखे, भावना अभिनाथ शेंडे. अनुसूचित जाती जमाती- फक्कड कृष्णा पितांबरे. इतर मागासवर्ग- बाजीराव शंकर शिंदे, भटक्या-विमुक्त जाती जमाती- आनंदा मारुती धानापुने.

Web Title: Todays Latest District Marathi News Kad22b00822 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top