शंभर वर्षांची बिनविरोध परंपरा मोडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभर वर्षांची बिनविरोध परंपरा मोडीत
शंभर वर्षांची बिनविरोध परंपरा मोडीत

शंभर वर्षांची बिनविरोध परंपरा मोडीत

sakal_logo
By

कडूस, ता.१० : दोंदे (ता.खेड) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या तेरा पैकी दहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यात सर्वपक्षीय व सर्वसमावेशक ग्रामस्थ पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनेलने बाजी मारली. यंदाच्या निवडणुकीमुळे सोसायटीची गेल्या शंभर वर्षाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच मोडीत निघाली.

दोंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी ग्रामस्थ व संचालक मंडळाने सोसायटीचा शताब्दी सोहळा धुमधडाक्यात साजरा केला होता. गेली शंभर वर्षे सोसायटीची निवडणूक बिनविरोध होत होती. हा जागांसाठी निवडणूक पार पडली. तीन पॅनेलचे एकूण अठरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीत सर्वपक्षीय व सर्वसमावेशक ग्रामस्थ पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनेलने आठ जागांवर विजय मिळवला, तर तीन उमेदवारांचा सहभाग असलेल्या भीमाशंकर सहकार विकास पॅनेलने दोन जागांवर बाजी मारली. पाच उमेदवारांचा सहभाग असलेल्या भैरवनाथ सहकारी विकास पॅनेलची पाटी मात्र कोरी राहिली. त्यांना एकही जागा मिळाली नाही.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमंत लादे, निवडणूक केंद्राध्यक्ष भरत हुलावळे, रमेश पाचारणे, राम नाणेकर, अर्जन भोकसे, गणेश निकम, निचिकेत प-हाड, सचिव बाळासाहेब बारणे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.

विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे : शंकर विठ्ठल उढाणे (२१३), ज्ञानेश्वर नागेश कदम (२९६), ज्ञानेश्वर बजरंग काळे (३०९), जितेंद्र सूर्यकांत कोहिनकर (२८५), महादू तुकाराम बनकर (२५४), धोंडिभाऊ रामभाऊ भालसिंगे (२१०), दत्तात्रेय धोडिंबा शितोळे (२२०), प्रकाश दत्तात्रेय सुकाळे (२५४). महिला राखीव - संध्या दत्तात्रेय बारणे (२५८), कविता मच्छिंद्र सुकाळे (२४८).

विद्यमान अध्यक्षांचा निवडणुकीत पराभव
सोसायटीच्या निवडणुकीत तेरा पैकी इतर मागास प्रवर्गातील आनंदराव राघुजी मेहत्रे आणि अनुसूचित जाती जमाती गटातून श्‍याम गेणा सोपान या दोन जागा बिनविरोध झाल्या, तर भटक्या विमुक्त जाती जमातीची एक जागा रिक्त राहिली. निवडणुकीत ४४६ पैकी ४०४ मतदारांनी मतदान केले. विद्यमान अध्यक्षांचा निवडणुकीत पराभव झाला.

00791

Web Title: Todays Latest District Marathi News Kad22b00823 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top