दोंदे सोसायटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कदम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोंदे सोसायटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कदम
दोंदे सोसायटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कदम

दोंदे सोसायटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कदम

sakal_logo
By

कडूस, ता. ३० ः शंभरी पार केलेल्या दोंदे (ता. खेड) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा प्रथमच मोडीत निघाली असतानाही ग्रामस्थांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध करण्यात मात्र यश मिळवले. अध्यक्षपदी ज्ञानेश्वर नागेश कदम तर उपाध्यक्षपदी धोंडिबा रामभाऊ भालशिंगे यांची बिनविरोध निवड झाली.
दोंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीची बिनविरोधची परंपरा यंदा मोडीत निघाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक सुद्धा चर्चेत आली होती. या निवडणुकीकडे परिसरातील गावांचे लक्ष लागले होते. परंतु, दहा जागांसाठी तीन पॅनेलमध्ये झालेल्या निवडणुकीत ग्रामस्थ पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनेलने बाजी मारली आणि ग्रामस्थ व पंच मंडळी सुचवतील त्यांना अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी काम करण्याची संधी मिळणार हे अधोरेखित झाले होते. त्याप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी एस. जी. लादे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सचिव बाळासाहेब बारणे यांनी सहायक म्हणून काम पाहिले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे ज्ञानेश्वर कदम व धोंडिबा भालशिंगे यांनी अर्ज दाखल केले. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्याने कदम यांची अध्यक्षपदी तर भालशिंगे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. या निवडणुकीत सोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर काळे, जितेंद्र कोहिनकर, महादू बनकर, प्रकाश सुकाळे, दत्तात्रेय शितोळे, शंकर उढाणे, संध्या बारणे, कविता सुकाळे, आनंदराव मेहेत्रे, श्याम ठाकर यांनी सहभाग नोंदवला. यावेळी राजगुरुनगर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिनकर, हनुमंतराव कदम, बाळासाहेब मंडलिक, खंडेराव करंडे, मुकुंद गारगोटे, मच्छिंद्र सुकाळे, किसन लगड, दत्तात्रेय बारणे, रामदास गारगोटे, राजेश बारणे, सचिन दरेकर, संभाजी कोहिनकर, सोपान सुकाळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Kad22b00828 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top