कडूसमध्ये जनावरांना मोफत लंपी प्रतिबंधक लस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडूसमध्ये जनावरांना मोफत लंपी प्रतिबंधक लस
कडूसमध्ये जनावरांना मोफत लंपी प्रतिबंधक लस

कडूसमध्ये जनावरांना मोफत लंपी प्रतिबंधक लस

sakal_logo
By

कडूस, ता. १२ ः खेड तालुक्यात जनावरांना लंपी आजाराची लागण होण्याचे प्रमाण वाढत असताना शासनाकडून मात्र लंपी प्रतिबंधक लस उपलब्ध होत नाही. याच पार्श्वभूमीवर कडूस (ता. खेड) परिसरातील जनावरांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट व शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय घनवट यांनी मोफत लस उपलब्ध करून दिली आहे.
खेड तालुक्यात जनावरांमध्ये लंपीची लक्षणे आढळून येत आहेत. जनावरांना ताप येणे, अंगावर फोड येणे, हे फोड फुटून जखमा होण्याचे प्रमाण वाढत आहे. या आजारात जनावरे दगावण्याची सुद्धा शक्यता असल्याने पशुपालक शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत करंजविहिरे, किवळे, वाळद, पाईट, रोहकल, चऱ्होली या सहा गावांमध्ये लंपीचा फैलाव झाला आहे. या सहा गावातील १८ जनावरांना लंपीची लागण झाली आहे. लंपीने बाधित होणाऱ्या जनावरांचे प्रमाण वाढत असताना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक असणारी लंपी प्रतिबंधित लस मात्र तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाकडून मिळेनाशी झाली आहे. अनेक पशुपालकांनी स्वखर्चाने लस खरेदी करून आपल्या जनावरांना दिली, परंतु वेगाने फैलाव होणाऱ्या आजाराची लस तालुक्यात उपलब्ध नसल्याने तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याचाच भाग म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय घनवट यांनी कडूस परिसरातील जनावरांना मोफत लस उपलब्ध करून दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते चांगदेव ढमाले, किसनभाऊ नेहेरे, कृषी सोसायटीचे अध्यक्ष पंडित नेहेरे, संचालक राजेंद्र ढमाले, आनंदा धानापुने, माऊली तुपे, लक्ष्मण नेहेरे, संतोष ढमाले, तुकाराम नेहेरे, शिवाजी बंदावणे, सदाशिव चव्हाण, बाळासाहेब ढमाले, अंजीराम नेहेरे व पशुपालक शेतकरी उपस्थित होते. यावेळी घनवट म्हणाले, ‘‘कडूस गावठाणासह वाड्यावस्त्यांवर घरोघरी जाऊन खासगी पशुवैद्यकीयांच्या मदतीने जनावरांना ही लस मोफत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कडूस पंचक्रोशीसाठी एक हजार लस पुरविण्यात आली असून गरज भासल्यास पशुपालकांची दौलत वाचविण्यासाठी आणखी लस मोफत पुरविण्यात येईल.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Kad22b00891 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..