गोरे यांनी सुचविलेल्या जागेवरच इमारत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोरे यांनी सुचविलेल्या जागेवरच इमारत
गोरे यांनी सुचविलेल्या जागेवरच इमारत

गोरे यांनी सुचविलेल्या जागेवरच इमारत

sakal_logo
By

कडूस, ता. १७ : खेड तालुका पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामाबाबत नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक झाली. यात माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळालेल्या जागेवरच खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम झाले पाहिजे, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खेड पंचायत समितीच्या इमारत बांधकामासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुरुवारी (ता. १५) मुंबई येथे बैठक झाली. त्याची माहिती आढळराव पाटील यांनी राजगुरुनगर येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘स्व. सुरेश गोरे हे आमदार असताना त्यांनी खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले होते. वर्क ऑर्डर होऊन या कामाचे भूमिपूजनसुद्धा झाले होते. परंतु, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत दिलीप मोहिते हे आमदार झाल्यानंतर त्यांनी या इमारतीच्या बांधकामाबाबत वाद सुरू केला. गोरे यांनी ठरवलेली जागा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हा वाद गेली चार वर्ष सुरू आहे. या श्रेयवादात इमारतीचे काम रखडले. आपली आमदारकी, उपमुख्यमंत्री अजित पवार व सत्तेचा गैरवापर करून आणि जिल्हा परिषदेत खोटे ठराव व शासनाला खोटी माहिती देऊन मोहिते यांनी इमारत रद्द केली. खोट्या केसखाली भगवान पोखरकर यांना सहा महिने जेलमध्ये टाकले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत सविस्तर माहिती देऊनही न्याय मिळाला नाही. आता शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळाला आहे. त्यामुळे स्व. गोरे यांनी सुचविलेल्या जमीन गट क्रमांक २०९ व २१० जागेवरच तीन मजली प्रशस्त इमारत होणार आहे.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, ज्योती अरगडे, अरुण गिरे उपस्थित होते.

वढू (ता. शिरूर) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ हे नाव बदलून स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हे मालिकेचे नाव देण्याचा खासदार अमोल कोल्हे यांचा घाट चुकीचा आहे, तो निर्णय आम्ही रद्द केला.
- शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार

Web Title: Todays Latest District Marathi News Kad22b00899 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..