
कर्मवीरांच्या जयघोषाने दुमदुमला वेताळे परिसर
कडुस, ता. २७ ः वेताळे (ता. खेड) येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ‘कर्मवीर भाऊराव पाटील अमर रहे’, ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
वेताळे येथे रयत शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धेश्वर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामधून ढोल-लेझीमच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक कार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे व डॉ. कामयानी सुर्वे या प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सविता बोंबले, उपसरपंच योगेश बोंबले, माजी सरपंच विठ्ठल बोंबले, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ॲड. संभाजी मिंडे, माजी सरपंच कैलास नाईकडे, कविता बोंबले, पोलिस पाटील सयाजी बोंबले, बंडोपंत बोंबले, सदस्य केतन चव्हाण, वि. ना. बोंबले, देविदास बोंबले आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक बी. एल. रणपिसे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मिलिंद कोबल व नीलिमा ढमाले यांनी केले, तर आभार एस. डी. गायकवाड यांनी मानले.
-------------------