राजगुरुनगरमध्ये आपत्ती व्यवस्थापन शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजगुरुनगरमध्ये आपत्ती व्यवस्थापन शिबिर
राजगुरुनगरमध्ये आपत्ती व्यवस्थापन शिबिर

राजगुरुनगरमध्ये आपत्ती व्यवस्थापन शिबिर

sakal_logo
By

कडुस, ता. १३ ः लोकमान्य मेडिकल फाउंडेशन, जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकमान्य मेडिकल फाउंडेशनचे सहदेव गोळे यांनी दिली.
हे शिबिर राजगुरुनगर येथील आनंदी आनंद मंगल कार्यालयात सुरू आहे. या वेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे विठ्ठल बनोटे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. बी. अदाते, लोकमान्य मेडिकल फाउंडेशनचे डॉ. विशाल क्षीरसागर, श्रीनिवास सत्तार, सहदेव गोळे, राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा उपस्थित होते. या शिबिरात आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि समुदाय आधारित व्यवस्थापनाबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.