बिबट्याच्या हल्ल्यात वेताळे येथे गाय ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याच्या हल्ल्यात
वेताळे येथे गाय ठार
बिबट्याच्या हल्ल्यात वेताळे येथे गाय ठार

बिबट्याच्या हल्ल्यात वेताळे येथे गाय ठार

sakal_logo
By

कडूस, ता ४ : वेताळे (ता. खेड) येथील नामदेव भिका बोंबले यांच्या घरासमोर असलेल्या दुभत्या गाईवर बिबट्याने गुरुवारी (ता. ३) सूर्योदयाच्या सुमारास हल्ला करून ठार मारले.
बोंबले यांचे घर वेताळे-साबुर्डी रस्त्यालगत कहू गावच्या बाजूच्या डोंगराच्या पायथ्याशी आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गाय घरासमोर असताना डोंगराच्या बाजूने आलेल्या बिबट्याने सुमारे चार वर्षे वयाच्या दुभत्या गाईवर अचानक झडप मारली. डोंगराच्या बाजूला झाडीत फरपटत ओढत नेऊन बिबट्याने गायीचा फडशा पडला. याचवेळी घरातून बाहेर आलेल्या अनिल बोंबले यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत गायीचा पंचनामा केला असून, ग्रामस्थांना बिबट्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले.
बिबट्याच्या हल्ल्यात ठार आलेल्या गाईची नुकसान भरपाई देण्याची मागणी नामदेव बोंबले यांनी केली. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी पाटीलबुवा दोरे, बाबूराव बोंबले, मारुती बोंबले व शेतकरी तसेच शेतात काम करणाऱ्या महिलांनी केली आहे.