खेडमधील एक हजार विद्यार्थी, पालकांना हेल्मेट

खेडमधील एक हजार विद्यार्थी, पालकांना हेल्मेट

कडूस, ता. २२ : वेल्हे तालुक्यातील सेवासारथी फाउंडेशन व सेवासहयोग फाउंडेशनच्या वतीने खेड तालुक्यातील प्राथमिक शाळांतील एक हजार विद्यार्थी व त्यांच्या एक हजार पालकांना चांडोली (ता. खेड) येथील कार्यक्रमात बुधवारी (ता. २२) हेल्मेटचे मोफत वाटप केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप मोहिते हे होते. यावेळी गटविकास अधिकारी अजय जोशी, गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, सरपंच आरती डोळस, उपसरपंच रूपेश ताये, सेवासारथी फाउंडेशनचे अमित तोडकर, सेवासहयोग फाउंडेशनच्या प्रतिक्षा शिंदे, संतोष पासलकर, ग्रामपंचायत सदस्य रामदास सावंत, स्वाती वाघमारे, प्रिया पवळे, सतीश सावंत, ग्रामसेवक प्रताप गुरव, केंद्रप्रमुख भीमराव पाटील, मुख्याध्यापक रामदास लांघी आदी उपस्थित होते.
खेड तालुक्यातील प्राथमिक शाळांतील काही शिक्षकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘साने गुरुजी विचारमंच’ने विद्यार्थी व पालकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेत या मोफत हेल्मेट वाटपासाठी प्रयत्न केले. त्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या मदतीने हेल्मेटच्या लाभार्थी विद्यार्थी व पालकांची नोंदणी केली. आवश्यक कागदपत्रे मुदतीत जमा केलेल्या एक हजार विद्यार्थी व त्यांच्या पालकांना हेल्मेट देण्यात आले. त्यासाठी साने गुरुजी विचार मंचचे अविनाश शिंदे, अमोल सांडभोर, अभिजित नाईकरे, संजय घुमटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. याच बरोबर शिक्षक सुभाष मुळूक, दत्तात्रेय बोडरे, विजय सुरकुले, सतिश यानभुरे, राजू गारगोटे, आत्माराम शिंदे, अशोक चव्हाण, विजय दाभाडे, नंदू वाघमारे, महादू राळे, बाळासाहेब दुंडे, शिवाजी सुकाळे, सुनील वाघ, अरविंद गवारी, बाबाजी शिंदे, राजेश लाडके, सलीम शेख, मुरलीधर कोहिनकर यांनी सहकार्य केले. अभिजित नाईकरे यांनी प्रास्ताविक; तर अविनाश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल सांडभोर यांनी आभार मानले.

वाहन चालवताना जसे डोक्यात हेल्मेट महत्त्वाचे, तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त महत्त्वाची. शिस्त पाळली; तर अपघात घडणार नाहीत. शिस्त पाळली नाही, तर कितीही हेल्मेट वापरा, अपघाताचा धोका हा राहणार. त्यामुळे जीवन जगताना सतत शिस्त पाळा.
- दिलीप मोहिते, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com