
ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने जखमी हरणाला जीवदान
कळस, ता. ६ : येथील (ता. इंदापूर) गोसावीवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिंकारा हरणास ग्रामस्थांच्या प्रसंगावधानतेमुळे जीवदान मिळाले. पाण्याच्या शोधात असलेल्या दोन वर्षे वयाच्या नर जातीच्या चिंकारा हरणावर काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला. यामध्ये ते हरिण जखमी झाले होते.
कुत्र्यांच्या तावडीत सापडलेले चिंकारा हरिण धाय मोकलून ओरडत होते. ही बाब लगतच्या शेतात काम करत असलेल्या नवनाथ खारतोडे, पूजा नवनाथ खारतोडे, संकेत सोमनाथ खारतोडे, पल्लवी दीपक खारतोडे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी कुत्री हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पाच ते सहा कुत्र्यांच्या तावडीत सापडेल्या हरणास कुत्रे सोडण्यास तयार नव्हते. यामुळे त्यांनी सुरुवातीला दगड मारत व नंतर काठीच्या साह्याने कुत्री हुसकावून लावली. ही बाब येथील पोलिस पाटील वैभव खर्चे यांनी वनपाल अशोक नरूटे यांना माहिती दिली. वन कर्मचारी ज्ञानदेव ससाणे यांनी जखमी हरणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रथमोपचार करून कात्रज येथील प्राणी संगोपन केंद्रात त्यास सोडण्यात आले.
Web Title: Todays Latest District Marathi News Kal22b00505 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..