
ंडाळज येथे अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सन्मान
कळस, ता. ६ : डाळज क्र. १ (ता. इंदापूर) येथील डाळज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा संस्थेच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डाळज विकास संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास जगताप तर उपाध्यक्षपदी सुमन वाकळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर हनुमान विकास संस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र गलांडे तर उपाध्यक्षपदी दत्तात्रेय पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डी. एन. जगताप, डाळज क्र. १ गावचे सरपंच विकास कुंभार, डाळज क्र. २ गावचे सरपंच अॅड. प्रदीप जगताप, डाळज क्र. ३ गावचे सरपंच दादासाहेब गलांडे, सतीश हगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीचा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी पार पडला. सदर संस्थांचे तीनही डाळज गावांत शेतकरी सभासद आहेत. येथील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे, वेळेत कर्ज वसूली करण्याबाबत संस्थेची कामगिरी चांगली आहे.
दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी भरणे यांची त्यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली व शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
.......
01213
Web Title: Todays Latest District Marathi News Kal22b00544 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..