काळेवाडीमध्ये नागरी सुविधांची वाणवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळेवाडीमध्ये नागरी सुविधांची वाणवा
काळेवाडीमध्ये नागरी सुविधांची वाणवा

काळेवाडीमध्ये नागरी सुविधांची वाणवा

sakal_logo
By

कळस, ता. २५ : पळसदेव (ता.इंदापूर) येथील उजनी धरणामुळे पुर्नवसित झालेल्या महसूल गावे काळेवाडी क्र.१ व २ गावांमध्ये अद्यापही रस्ते, गटार, शालेय इमारती, स्मशानभूमी अशा अनेकविध मुलभूत नागरी सुविधांची वाणवा आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विकासाला खिळ बसली आहे. त्याचा ग्रामस्थांना मोठा फटका बसत आहे. यामुळे आणखी किती दिवस आम्ही हा त्रास सहन करायचा? असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत.
उजनी धरणामुळे पुर्नवसन होवून ४४ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अद्यापपर्यंत नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. शालेय इमारती, रस्ते, गटार आदी कामे रखडलेली आहेत. परंतु सर्वातत महत्वाचे काम म्हणजे या गावांमध्ये स्मशानभूमी बांधण्यात आलेली नाही. सरकारने गावासाठी दिलेल्या जमिनीवर स्मशानभूमीसाठी जागा राखीव ठेवलेली नाही. यामुळे स्मशानभूमी बांधण्यासाठी आमदार किंवा जिल्हा परिषद निधीतून रक्कम मंजूर केली तरी, जागेअभावी बांधकाम करणे शक्य नाही. सन २०१९ मध्ये काळेवाडी क्र. २ येथील स्मशानभूमीसाठी शेड बांधण्यासाठी २ लाख ३६ हजार तर शेडपर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी ४२ लाख २८ हजारांचा निधी उजनी पुर्नवसन प्रकल्पाअंतर्गत मंजूर झाला आहे. सदर कामाचे माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भूमिपूजनही केले. परंतु या कामास अद्याप मुहुर्त मिळाला नसल्याची वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, येथील ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील काळे, दिपाली महेंद्र काळे म्हणाले, गावाला हक्काची स्मशानभूमी नसल्याने स्थानिकांना मृत नातेवाईकाचा रस्त्यांवर अंत्यविधी करावा लागतो. पावसाळ्यात ही समस्या गंभीर असते. गावचे पुर्नवसन करण्यासाठी वनजमीन १५ जुलै १९८० रोजी पुर्नवसन संचालकांकडे वर्ग करण्यात आली. याबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले. परंतु सदर जमिनीवर राखीव वन व पुर्नवसन संचालकांची मालकी हक्कात नावे आहेत. असे येथील स्थानिक नागरिकांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.


सुविधांच्या कामास वनविभाग विरोध
जमिनींचा संयुक्तिक उतारा निघत आहे. परंतु गटांची हद्द व आणेवारी स्पष्ट नसल्याने नागरी सुविधांच्या कामास वनविभाग विरोध करत आहे. परिणामी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा जमिनीवर ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र, वाणी समाजाची दफनभूमी आदी कामे वनविभागाने बंद पाडून दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीवर बेकायदेशीरपणे वनगुन्हा दाखल केला आहे. यामुळे विकासकामाला खीळ बसली आहे. .....

........

Web Title: Todays Latest District Marathi News Kal22b00563 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..