सोलापूर महामार्गावर सीसीटीव्हीची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर महामार्गावर सीसीटीव्हीची गरज
सोलापूर महामार्गावर सीसीटीव्हीची गरज

सोलापूर महामार्गावर सीसीटीव्हीची गरज

sakal_logo
By

कळस, ता. २७ : "पुणे-सोलापूर महामार्गावर चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या गाडीवर हल्ला करून तीन कोटी ६० लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली. लुटारुंचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी महामार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची गरज आहे,'''' असे मत महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरिक्षक महेश कुरेवाड यांनी व्यक्त केले आहे.
भिगवण ते इंदापूर हा पन्नास किलोमिटरहून अधिक लांबीचा टप्पा आता संवेदनशील टप्पा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. अपघाताबरोबर आता प्रवासी लुटीच्या घटनांत वाढ होवू लागली आहे. परंतु कालच्या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार वरकुटे पाटी ते स्वामी चिंचोलीपर्यंतच्या परिसरात पोलिस घटनाक्रम जाणून घेत आहेत. मात्र या पट्ट्यात महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे असते तर तपास आणखी सुलभ झाला असता, असे कुरेवाड यांनी वरकुटे येथील घटनेबाबत ''सकाळ''च्या प्रतिनिधी संवाद साधला.
भिगवण, डाळज, पळसदेव, लोणीदेवकर, वरकुटेपाटी, गागरगाव, एस.बी. पाटील, गलांडवाडी चौक आदी भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. याशिवाय अल्पकालीन संदेश यंत्रणा कार्यान्वित करणे महत्त्वाचे आहे. पळसदेव, डाळज या भागातील महामार्गाच्या चौकात हायमास्ट दिवे उभारण्याची मागणी होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी महागाईच्या नावाखाली टोल वसुलीच्या रकमेत वाढ करणाऱ्या टोल कंपनीने व हायवे अॅथोरीटीने महामार्गावरील त्रुटी तत्काळ दूर करण्याची गरज आहे.

दरम्यान, महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरिक्षक महेश कुरेवाड म्हणाले, सध्या महामार्गावरील अशा घटना रोखण्यासाठी नॅशनल हायवे अॅथोरिटीच्या जवानांच्या पथकाने रात्रीच्यावेळी सतत गस्त घालणे गरजेचे आहे. याशिवाय महामार्गावरील मोठ्या गावांच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, हायमास्ट दिवे उभारणे ही कामे महत्त्वाची आहेत. याशिवाय टोल कंपनीकडे अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी हायड्रो क्रेन, जेसीबी यंत्र, अग्निशामक वाहन, पाण्याचे टँकर, अत्याधुनिक रुग्णवाहिका, गॅस कटर आदी साहित्य उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र सदर सामग्रीचा अभाव दिसून येत आहे. यामुळे वरिष्ठांना टोल कंपनीकडे ही सामग्री उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Kal22b00569 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..