डाळज येथे अपघातात मोटारीतील दोघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डाळज येथे अपघातात
मोटारीतील दोघे जखमी
डाळज येथे अपघातात मोटारीतील दोघे जखमी

डाळज येथे अपघातात मोटारीतील दोघे जखमी

sakal_logo
By

कळस, ता. ६ : पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज क्र. २ (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (ता. ६) सकाळी दहा वाजता दोन मोटारींमध्ये झालेल्या अपघातात दोनजण जखमी झाले. रस्ता चुकल्याने महामार्गावर पन्नास मीटरहून अधिक अंतर चुकीच्या पद्धतीने मोटार मागे घेत असलेल्या मोटारीला दुसऱ्या मोटारीची धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.
पुण्याहून सोलापूर दिशेने चाललेली स्वीफ्ट डिझायर मोटार (एम.एच. १४ एच.यू. १७०७) चालक विकास सुरेश पाटील (वय ३८, रा. वाकड, पुणे) याने रस्ता चुकल्याने सुमारे ६० मीटरहून अधिक अंतर मागे आणली. त्यावेळी मागून आलेल्या दुसऱ्या स्विफ्ट मोटारीची (एम.एच. १४ बी.के. ७३१५) धडक बसून ती पलटी झाली. यामधून प्रवास करणारे इम्रान पैगंबर तांबोळी (वय ३१) व अकीला पैगंबर तांबोळी (वय ५०, रा. पुणे) हे जखमी झाले.
दरम्यान, या अपघाताची माहिती ‘मृत्युंजय दूत’ पिंटू मांढरे यांनी महामार्ग पोलिसांना दिली. जखमींना भिगवण येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक महेश कुरेवाड यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

‘क्रेनची सुविधा मोफत मिळावी’
महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी महामार्ग पोलिस मदत केंद्रावर क्रेन व रुग्णवाहिका तैनात असणे गरजेचे आहे. मात्र, अशा वेळी अनेकदा खासगी क्रेन व रुग्णवाहिकेची मदत घेतली जाते. उशिराने का होईना पण ही खासगी मदत मिळालेल्यांना नंतर आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे रुग्णवाहिका व क्रेनची सुविधा मोफत मिळणे गरजेचे आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Kal22b00579 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..