इंदापुरात प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी ९४ अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी ९४ अर्ज
इंदापुरात प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी ९४ अर्ज

इंदापुरात प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी ९४ अर्ज

sakal_logo
By

कळस, ता. ८ : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी इंदापूर तालुक्यातून आतापर्यंत ९४ प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी अर्ज दाखल झाले असून, यापैकी २० अर्ज मंजूर झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज दाखल होण्याच्या यादीत तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून, दौंड तालुक्याचा अर्ज दाखल होण्यामध्ये पहिला क्रमांक आहे. शेतकऱ्यांनी सहभागी होऊन शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारावेत, असे आवाहन इंदापूर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी केले.
या योजनेतून नव्याने उभारलेल्या उद्योगास किंवा सध्या सुरू असलेल्या उद्योगाच्या विस्तारीकरण करण्यासाठी शासनाकडून ३५ टक्के अनुदान मिळत आहे. या योजनेत केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा ६०:४० आहे. या योजनेतून पशुखाद्य, फिशफीड, पोल्ट्री फीड, फळे व भाजीपाला प्रक्रिया, अन्न धान्य प्रक्रिया ज्वारी, बाजरी, मका, गूळ, दुग्ध प्रक्रिया, बेकरी, तेलघाना, फरसाण, शेवया या व इतर सर्व अन्नधान्यावरील प्रक्रिया अथवा मूल्यवर्धन प्रकल्प उभारता येतात. यामध्ये वैयक्तिक अथवा बचत गटातील लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. तर सहकारी संस्था किंवा फार्मर्स प्रोडूसर कंपनीला प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त तीन कोटीपर्यंत अनुदान मिळेल. या योजनेत मंजूर होणारे कर्ज कृषी पायाभूत सुविधा उभारणी या योजनेत वर्ग करून देण्याबरोबर, घेतलेल्या कर्जावर सात वर्षासाठी व्याजामध्ये ३ टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये सहभागी होऊन प्रकल्प उभारण्यासाठी शेतकरी असल्याची अट नाही. सदर योजना ही बँक कर्जाशी निगडित आहे. तसेच, लाभार्थ्याने केवळ आवश्यक कागदपत्रे द्यावयाची आहेत. बँकेकडून कर्ज मंजुरीस सहमती दिल्यास पुढील सर्व कार्यवाही जिल्हा संसाधन व्यक्ती व कृषी विभागाकडून करण्यात येते.

Web Title: Todays Latest District Marathi News Kal22b00581 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..