ट्रॅक्टर व्यावसायिकांच्या उत्पन्नात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रॅक्टर व्यावसायिकांच्या उत्पन्नात घट
ट्रॅक्टर व्यावसायिकांच्या उत्पन्नात घट

ट्रॅक्टर व्यावसायिकांच्या उत्पन्नात घट

sakal_logo
By

कळस, ता. ६ : डिझेल-पेट्रोलच्या वाढलेल्या किमती व देखभाल-दुरुस्ती खर्चात झालेली वाढ झालेली आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची मशागत करणे महाग झाले आहे. परिणामी मशागतीची कामे करून देणाऱ्या ट्रॅक्टर व्यावसायिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांचा आलेख पाहता, पेट्रोल-डिझेलने भाववाढीचा उच्चांक गाठला आहे. याशिवाय अन्य पेट्रोलियम पदार्थही महाग झाले आहेत.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा शेती हा कणा आहे. शेती पिकेल तर शेतकरी टिकेल याप्रमाणे शेतीच्या मशागतीसाठी प्रामुख्याने गरज असलेल्या ट्रॅक्टरसाठी कृषी विभागाच्या विविध यांत्रिकीकरण योजनांतून सव्वा लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाते. केवळ इंदापूर तालुक्यात दोन वर्षांमध्ये सव्वाशेहून अधिक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात आले आहे. याशिवाय थेट ट्रॅक्टर कंपन्यांकडूनही मिळालेल्या सवलतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दारात ट्रॅक्टर आले आहेत. यामुळे शेतीच्या मशागतीचे काम सोपे झाले असले, तरी यासाठी होणारा खर्च मात्र वाढला असल्याचे मत शेतकरी व ट्रॅक्टर चालक बोलून दाखवीत आहेत.

गेली १४ वर्षे मी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीच्या मशागतीची कामे करत आहे. सुरवातीची ९ वर्षे मी रोजंरादीने काम केले. यानंतर स्वतः ट्रॅक्टर खरेदी करून शेतीच्या मशागतीची कामे करून देण्याचा व्यवसाय करत आहे. यासाठी प्रतितास आठशे रुपये दर सुरू आहे. मात्र वाढलेल्या डिझेलच्या किमती, ल्युब्रीकेंटच्या किमतीमुळे हे काम आता परवडेनासे झाले आहे.
- हेमंत जाधव, ट्रॅक्टर मालक

शेतकऱ्यांसाठी मशागत महाग
ज्यावेळी ६५ रुपये प्रतिलिटरने डिझेल मिळत होते, तेव्हा ६०० रुपये प्रतितासाने शेतीच्या मशागतीची कामे केली जात होती. यावेळी खर्च वजा जाता चांगले उत्पन्न मिळत होते. आता मात्र ८०० रुपये प्रतितासाने काम करुनही फारसे शिल्लक राहत नाही. कारण ९३ रुपये प्रतिलीटरने डिझेलची खरेदी करावी लागत आहे. याशिवाय ट्रॅक्टरच्या सर्व्हिंसिंगचा खर्च वाढला आहे. ऑईलच्या किमती वाढल्या आहेत. धातूंच्या किमती वाढल्याने सुट्टे भाग महाग झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी मशागत महाग तर मशागत करून देणाऱ्या ट्रॅक्टरमालकांच्या उत्पन्नात तूट होत असल्याचे चित्र सध्या आहे, असे एका शेतकऱ्याने ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

01406