मोटारीने धडक दिल्याने महामार्गावर एकजण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटारीने धडक दिल्याने
महामार्गावर एकजण ठार
मोटारीने धडक दिल्याने महामार्गावर एकजण ठार

मोटारीने धडक दिल्याने महामार्गावर एकजण ठार

sakal_logo
By

कळस, ता. १ ः पुणे - सोलापूर महामार्गावर डाळज क्रमांक २ (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत भरधाव मोटारीने धडक दिल्याने पिलेवाडी येथील अशोक सोपान पिसाळ (वय ५५) जागीच ठार झाले.

महामार्ग पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. रस्ता ओलांडत असताना पुणे बाजूकडून आलेल्या भरधाव मोटारीने (क्रमांक एमए-१३ डीटी- ८६००) पिसाळ यांना जोराची धडक दिली.
अपघातानंतर मोटारचालक मोटार सुसाट घेऊन पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरिक्षक धर्मपाल सांगळे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी रवाना झाले. वाहतूक सुरळीत करत, सदर मृतदेह रुग्णवाहिकेतून भिगवणच्या सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला.
........