कळस येथे हरणेश्वर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळस येथे हरणेश्वर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन
कळस येथे हरणेश्वर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

कळस येथे हरणेश्वर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

sakal_logo
By

कळस, ता. १२ : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणे गरजेचे आहे, यातून विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित होण्यास मदत होते. विद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यास प्रभावी ठरते. या अनुषंगाने हरणेश्वर विद्यालयाकडून राबविण्यात येणारे उपक्रम स्तुत्य असून, यातून विद्यार्थ्यांचा बौधिक विकास होण्यास मदत होईल असे मत सरपंच वृषाली पाटील यांनी व्यक्त केले.
कळस (ता. इंदापूर) येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन सरपंच पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापक रामचंद्र पवळ, पर्यवेक्षक अंकुश सोनवणे, सुनील चांगण, अशोक घोळवे आदी उपस्थित होते.
दरम्यान विद्यालयात आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात पाचवी ते बारावीपर्यंतच्या सुमारे ४५०हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पर्यावरण संवर्धन, वाहतूक परिवहन, पाणी बचत, सेंद्रिय शेती, वीज निर्मिती, वीज बचत, प्रदूषण निर्मुलन, सौर ऊर्जा, स्वच्छता व आरोग्याशी संबंधित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. तर, सामाजिक संदेश, शिक्षण, भारतीय संस्कृती, आवडते व्यक्तिमत्त्व, पाणी हेच जीवन आदी विषयांवर विद्यार्थिनींनी आकर्षक रांगोळी रेखाटली होती. विविध विषयांवरील चित्रांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये लोकनेते शरदचंद्रजी पवार, भारतीय संविधान व आजचे वर्तमान, नवीन शैक्षणिक धोरण-संधी व आव्हाने, राष्ट्राच्या जडण-घडणीत युवकांचे स्थान या विषयांवर मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षिका वैशाली निंबाळकर, दीपाली सातकर, सीमा खारतोडे, संगीता टकले, दीपा माने, रजिया तांबोळी आदींनी परिश्रम घेतले.