इंदापूरात बुधवारी बाजरीच्या पाककलेची स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरात बुधवारी बाजरीच्या पाककलेची स्पर्धा
इंदापूरात बुधवारी बाजरीच्या पाककलेची स्पर्धा

इंदापूरात बुधवारी बाजरीच्या पाककलेची स्पर्धा

sakal_logo
By

कळस, ता. १८ : यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याने, तृणधान्य उत्पादनाच्या वाढीबरोबर त्याचा आहारात समावेश व्हावा. या दृष्टिकोनातून शासनस्तरावर प्रयत्न होत आहेत. याचाच एक भाग म्हणून इंदापूर येथे बाजरीपासून विविध पदार्थ बनविण्याच्या स्पर्धेचे बुधवारी (ता. २५) आयोजन केल्याची माहिती इंदापूर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी दिली.
ते म्हणाले, भारतीय खाद्यपदार्थांमध्ये बाजरीच्या पिठाची भाकरी किंवा थालीपीठ हा मुख्य पदार्थ आहे. परंतु याबरोबर बाजरीपासून खिचडी, खीर, चुर्मा मेथीचे धपाटे, खारी शेव, लाडू, बर्फी, पकोडे ढोकळा, चाट, खारी व गोड बिस्किटे, इडली, पास्ता, नानकटाई केक, ब्रेड यांसारखे पदार्थ बनविणे शक्य आहे. घरगुती किंवा विक्रीच्या दृष्टीने अशा पदार्थांचा लघुउद्योग केल्यास उत्पन्नाचे साधन निर्माण होऊन आर्थिक स्तर उंचविण्यास मदत होईल. तालुक्यातील महिलांनी या स्पर्धेत सहभागी होऊन, बाजरीच्या विविध पदार्थांचे सादरीकरण करावे. यामध्ये विजेत्या महिलांना बक्षिसांचे वाटप केले जाणार आहे. आहारतज्ञांच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी पाककलांची पाहणी केली जाईल. विजेत्यांना रोख बक्षिस देण्यात येईल. तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन रूपनवर यांनी केले.