पळसदेव येथे शेतकऱ्यांना बाजरी बियाणांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पळसदेव येथे शेतकऱ्यांना बाजरी बियाणांचे वाटप
पळसदेव येथे शेतकऱ्यांना बाजरी बियाणांचे वाटप

पळसदेव येथे शेतकऱ्यांना बाजरी बियाणांचे वाटप

sakal_logo
By

पळसदेव, ता. १६ : ''''तृणधान्याचे आहारातील महत्त्व नागरिकांना पटवून देण्याबरोबर पेरणी क्षेत्राची वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभाग विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.'''' असे मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे यांनी सांगितले.

पळसदेव (ता. इंदापूर) माळेवाडी येथे पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारातून भिगवण कृषी मंडल अंतर्गत असलेल्या मोफत बाजरी बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक जी. डी. खंडागळे, कृषी सहायक गणपत खांडेकर, प्रशांत मोहोळकर, हनुमंत बनसुडे, बबन बनसुडे, रामदास पवार, नवनाथ इंजे, बाबा बनसुडे, विकास बनसुडे, शिवाजी फुले, पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते.
बाजरीमध्ये कॅल्शियम, व्हिट्यामिन अ, ब, फॉस्फरस, लोह अधिक प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे रक्तातील मेदाचे प्रमाणात नियंत्रित राहते. रक्तदाबावर नियंत्रण, शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी अॅनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे. पौष्टिक तृण धान्याचे उत्पादन प्रामुख्याने कोरडवाहू भागात होत असल्याने, शेतकऱ्यांची पौष्टिक तृण धान्याची पीक पद्धती टिकून राहण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने निविष्ठा पुरविल्या जात आहेत. यामध्ये सुधारित बियाणे, औजारे, खत पुरवठा करून अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला मदत केली जात असल्याचे कोकणे यांनी स्पष्ट केले.


01748