माळेवाडी रस्त्याचे काम दर्जेदार करा

माळेवाडी रस्त्याचे काम दर्जेदार करा

पळसदेव, ता. ९ : पळसदेव (ता. इंदापूर) येथील मुख्य बाजारपेठेतून जाणारा पुणे-सोलापूर महामार्ग ते माळेवाडी या रस्त्याचे काम दर्जेदार व पारदर्शक करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. रस्त्याच्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असून, ग्रामस्थांना विश्वासात घेऊन रस्त्याचे काम करण्याची गरज आहे, असे ''कर्मयोगी''चे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे यांनी सांगितले.

ते म्हणाले, या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गावातील मुख्य बाजारपेठेतून जाणारा हा रस्ता असल्याने, व्यापारी व ग्रामस्थांना विश्वासात घेवून रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. सध्या ठेकेदाराने काम सुरु केले आहे. मात्र ग्रामपंचायतीकडे याबाबत अधिकृत काहीच माहिती उपलब्ध नाही. यामुळे आम्ही कामाच्या अंदाजपत्रकाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली. मात्र त्यांनीही ते देण्याचे टाळले. रस्त्याचा काही भाग काँक्रीटीकरण तर उर्वरित टप्पा डांबरीकरण करण्यात येणार आहे. मात्र बाजारपेठेतील टप्प्यामध्ये रस्त्याचे मजबूत काम व्हावे, रस्ता रुंदीकरणात कोणावरही अन्याय होवू नये याबाबत सार्वजनिक विभागाने कोणती पावले उचलेली नाहीत. यामुळे ग्रामस्थांमध्ये समज-गैरसमज निर्माण झाले असून, लोकांच्या तक्रारी येण्याचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता के. टी. साळूंखे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अंदाजपत्रक ग्रामपंचायतीच्या फलकावर लावायची वस्तू नाही. आमच्याकडे माहिती अधिकारातून मागणी केल्यास अंदाजपत्रक दिले जाईल. कामाच्या स्वरुपाचा फलक लावायची तरतूद नाही. गावातंर्गत असलेले वाद व मतभेद रस्त्याच्या कामासाठी अडचणीचे ठरत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी असलेल्या या रस्त्याचे काम नियमानुसार व दर्जेदार करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. परंतु काहीजण वेगळ्या हेतूने तक्रार करत आहेत.
..........
01790

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com