कळस येथे अपघातात
दोन प्ररप्रांतीय मजूर ठार

कळस येथे अपघातात दोन प्ररप्रांतीय मजूर ठार

कळस, ता. १३ : कळस (ता. इंदापूर) येथे लोणी-देवकर रस्त्यावर वायाळवस्तीजवळ मोटारसायकलला ट्रकने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. तर, एकजण गंभीर जखमी झाला. गौरीशंकर राम व वरुण राम, अशी त्यांची नावे आहेत. हे अपघातग्रस्त परप्रांतीय असून, ते येथे शेतीची कामे मजुरीने करण्यासाठी आलेले आहेत.
शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तीन परप्रांतीय मजूर गावातून बाजार साहित्य घेऊन मोटारसायकलवरून (क्र. एम.एच.४२ ८८७७) वायाळवस्तीकडे निघाले होते. यावेळी डांबरीकरणाचे अस्तर करणारे मशिन घेऊन जाणाऱ्या ट्रकची (क्र. एमएच ०४ एफ ६९७२) त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये मोटारसायकल ट्रकच्या पुढील चाकात अडकून राहिली. अडकलेली मोटारसायकल ट्रकने पन्नास फुटांहून अधिक अंतर फरपटत नेली. यावेळी मोटारसायकलवरील तिघे फरपटत गेले. यातील एकाच्या डोक्यावरून चाक गेले. दुसऱ्‍याला गंभीर मार लागल्याने तोही जागीच ठार झाला. संतोषसिंह हा गंभीर जखमी झाल्याने त्याला बारामतीच्या दवाखान्यात नेण्यात आले.
दरम्यान, अपघाताची खबर देऊनही पोलिस उशिरा पोचल्याने मृतदेह तासभराहून अधिक वेळ रस्त्यावर पडून होते. छिन्नविछिन्न झालेले मृतदेह पाहण्यायोग्य नसल्याने, रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी सदर अपघात पाहून हळहळ व्यक्त करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com