
कोरेगाव भीमा येथील शाळेत रंगले मजेदार किस्से
कोरेगाव भीमा, ता. २३ : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील सन २०००च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २२ वर्षांनंतर स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आले. यावेळी माजी विद्यार्थी जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले.
एकत्र जमलेल्या या विद्यार्थ्यांनी पूर्वीच्या शालेय परिपाठाच्याच मैदानावर बसून तत्कालीन शिक्षकांचे मनोगत ऐकले. यावेळी वयाची सत्तरी ओलांडलेल्या शिक्षकांचा बोलण्यातील स्पष्टपणा पाहून माजी विद्यार्थीही हरपले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वजण प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करत होते. शाळेतील जुन्या आठवणी मजेदार किस्से एकमेकांना सांगत सर्वजण हास्यविनोदात रमले.
हायस्कूलचे मुख्याध्यापक कुंभारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. तर दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. या मेळाव्यासाठी तत्कालीन शिक्षक गणपतराव महामुलकर, डी. एल. देसाई, हरिश्चंद्र आवारे, अविनाश चव्हाण, सुरेश डुके, सूर्यवंशी, वंदना पाटील, शरयू महामुलकर, डुके तसेच शिक्षकेतर कर्मचारी संपतराव लोंढे आदी उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने माजी शिक्षकांचा शिवप्रतिमा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयाला सरस्वतीची मूर्ती भेट देण्यात आली. तर शिक्षकेतर कर्मचारी वसंतराव जेधे यांचा सेवापूर्तीनिमित्त विशेष सन्मानही करण्यात आला. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राहुल ढेरंगे, पहिलवान बालाजी गव्हाणे, तुषार गव्हाणे, आकाश नाबगे, भाऊसाहेब गव्हाणे, रेखा ढेरंगे-शिंदे, अंबिका परदेशी यांनी पुढाकार घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणले. या प्रसंगी माजी उपसरपंच कांतिलाल फडतरे, गणेश पोटफोडे, कचरू बवले, अझरुद्दीन पठाण, सुजाता लोहार-पवार, शुभांगी गव्हाणे- तांबे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी भाऊसाहेब फडतरे, भरत आरगडे, संजय गव्हाणे, मनोज नाबगे, राजेश ढेरंगे, गणेश राऊत, प्रकाश गव्हाणे, धनराज भडकुंबे आदींनी परिश्रम घेतले. विक्रांत कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रवीण गव्हाणे यांनी आभार मानले. स्नेहसंमेलनानिमित्त वडाच्या झाडाचे रोपणही करण्यात आले.
Web Title: Todays Latest District Marathi News Kbm22b02261 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..