शंभूराजेंच्या जयंतीनिमित्त वढू येथे आज कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभूराजेंच्या जयंतीनिमित्त 
वढू येथे आज कार्यक्रम
शंभूराजेंच्या जयंतीनिमित्त वढू येथे आज कार्यक्रम

शंभूराजेंच्या जयंतीनिमित्त वढू येथे आज कार्यक्रम

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. १० : धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त उद्या (ता. ११) श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा मंच तसेच श्री धर्मवीर संभाजीराजे स्मृती समितीच्या वतीने उत्सवानिमित्त आज आयोजित करण्यात आलेल्या सणसवाडी येथील बैलगाडा शर्यतीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी पुणे जिल्ह्यातील नामांकित २८० बैलगाडा मालक सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकाळी पुरंदर ते श्रीक्षेत्र वढू बुद्रुक अशी ज्योत आणण्यात येणार असून महिलांच्या हस्ते ज्योत पूजन तसेच श्रीमंत वृषालीराजे भोसले यांच्या उपस्थितीत शंभू पाळण्याचा कार्यक्रम होईल. तर दुपारी संगीत भजन, महाप्रसाद तसेच सायंकाळी भव्य मिरवणुकीसह रोषणाई तसेच आतषबाजीही करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Kbm22b02282 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top