डिंग्रजवाडीत बिबट्या जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिंग्रजवाडीत बिबट्या जेरबंद
डिंग्रजवाडीत बिबट्या जेरबंद

डिंग्रजवाडीत बिबट्या जेरबंद

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. २२ : डिंग्रजवाडी (ता. शिरुर) हद्दीत आज (ता.२२) अखेर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. डिंग्रजवाडी परिसरातील बिबट्याचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण होते.
बिबट्याला पकडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यामुळे पिंजरा लावण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते खंडुअण्णा गव्हाणे व स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात वनविभागाने पिंजरा लावला होता. यात बिबट्या जेरबंद होताच त्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

यावेळी या बिबट्याला नेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्यासह वनअधिकारी व वनकर्मचारी आले होते. या बिबट्याला जुन्नर येथील माणिकडोह केंद्रात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या परिसरात आणखी एक बिबट्या असल्याची शक्यता माहिती अधिकार कार्यकर्ते खंडुअण्णा गव्हाणे व ग्रामस्थांनी व्यक्त केली असून त्याबाबत खातरजमा करून पिंजरा लावण्याचे आश्वासन वनविभागाने दिले आहे.
---------------
03080

Web Title: Todays Latest District Marathi News Kbm22b02298 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top