पेरणे येथे जमिनीच्या वादातून अपहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेरणे येथे जमिनीच्या वादातून अपहरण
पेरणे येथे जमिनीच्या वादातून अपहरण

पेरणे येथे जमिनीच्या वादातून अपहरण

sakal_logo
By

केसनंद, ता.२ : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून पेरणे (ता. हवेली) येथे चुलतभावाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणात अपहरण झालेल्या गणेश विठ्ठल कदम (वय ४१, रा. कदम हाऊस, चिखली, पिंपरी-चिंचवड) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी प्रकाश कदम, रमेश कदम, तुळशीराम कदम, हर्शल कदम, (सर्व रा. कदमवस्ती, पेरणे, ता. हवेली) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कदम यांच्या पेरणे येथील जमिनीचा वाद चुलत भावांबरोबर सुरु आहे. गुरुवारी (ता. ३०) गणेश कदम व चालक पप्पू कांबळे हे वाघोलीत कामा निमित्त आल्यानंतर हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी मोटारीतून अचानक चौघेजण आले व त्यांनी बळजबरीने गणेश यांचा मोबाईल हिसकावत शिवीगाळ व मारहाण करून दोघांनाही जबरदस्तीने गाडीत बसवून पेरणे येथील कदमवस्तीतील घरात डांबून ठेवले. तसेच तुझ्या नावावरील जमीन आमच्या नावावर कर नाहीतर मारून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ व मारहाणही केली. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी गणेश कदम यांनी खिडकीतून एका तोंड ओळखीच्या व्यक्तीव्दारे त्यांच्या कार्यालयाशी व पोलिसांशी संपर्क साधल्याने शुक्रवारी (ता. ०१) पोलिसांनी येऊन सुटका करीत त्यांना ठाण्यात घेऊन गेले.

Web Title: Todays Latest District Marathi News Kbm22b02304 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top