मांजरीत झाड कोसळून दोन खांब जमीनदोस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांजरीत झाड कोसळून दोन खांब जमीनदोस्त
मांजरीत झाड कोसळून दोन खांब जमीनदोस्त

मांजरीत झाड कोसळून दोन खांब जमीनदोस्त

sakal_logo
By

केसनंद, ता. ११ : मांजरी खुर्द (ता. हवेली) येथे वीजवाहक तारेवर झाड कोसळून वीजेचे दोन खांब जमीनदोस्त झाले. यावेळी शेतात काम करणारे शेतकरी नशीब बलवत्तर म्हणून बचावले.
मांजरी खुर्द (ता. हवेली) येथे कालपासून संततधार पावसामुळे दुपारी वीजवाहक तारेवर झाड कोसळून येथील गट नं. २०५ तसेच शेजारील गट नं.२०८ व २११ मधील विजेचे खांबही जमीनदोस्त झाले. यावेळी शेतात काम करणारे प्रगतशील शेतकरी व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश उंद्रे तसेच शेजारील शेतात काम करणारे शेतकरी व महिला केवळ दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले. त्यांच्या अगदी शेजारीच या तारा पडल्या तसेच त्यात वीज प्रवाहही सुरु होता.
दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणच्या वाघोली येथील कार्यालयात अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून महावितरणने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी पुणे जिल्हा वीज समिती सदस्य प्रदीप कंद यांनी महावितरणकडे केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Kbm22b02310 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top