घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद
घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद

घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद

sakal_logo
By

केसनंद, ता. २१ : पेरणेफाटा (ता. हवेली) येथील न्यू विसडम इंग्लिश शाळेत घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात लोणीकंद तपास पथकाला यश आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी महेश ऊर्फ मायकल नवनाथ कांबळे (वय २७, रा. लेन नंबर ९, बडोदा बँकेच्या मागे, थिटे वस्ती, खराडी, पुणे) व सोमेश्वर ऊर्फ सोमेश फागण येडे (वय २८, रा. सध्या रा. के ऑफ सागर भंडारी, लेन नंबर ९, थिटे वस्ती, खराडी, पुणे, मुळपत्ता मु. निरज, पोस्ट दासगाव, ता. गोंदीया, जि. गोंदीया) याना अटक केली आहे.
पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या सूचनेप्रमाणे लोणीकंदचे पोलिस उपनिरीक्षक सूरज गोरे पथकासह गस्त घालत असताना नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवर दोघेजण वाघेश्वर चौकात थांबले असून त्यांचेजवळ कॉम्प्युटर डिसप्ले, इनव्हर्टर बॅटरी व अॅम्प्लीफायर असे साहित्य असून सदरच्या व्यक्ती चोर असण्याची शक्यता असल्याने सूरज गोरे यांनी पथकासह सांगितले. त्यानुसार
पथाने संशयिताना ताब्यात घेतले यावेळी मोटर सायकल ही खराडी येथील एचपी पेट्रोलपंपाचे मागे असलेल्या लेबर कॅम्पमधून चोरी केल्याचे सांगितले. तसेच कॉम्प्युटर डिसप्ले, इनव्हटर, बॅटरी, व अॅम्प्लीफायर हे पेरणे फाटा येथील विसडम इंग्लिश स्कूल येथून चोरी केले असल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Kbm22b02351 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..