अष्टापूर येथे घर, गोठ्यांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अष्टापूर येथे घर, गोठ्यांचे नुकसान
अष्टापूर येथे घर, गोठ्यांचे नुकसान

अष्टापूर येथे घर, गोठ्यांचे नुकसान

sakal_logo
By

केसनंद, ता. १८ : अष्टापूर (ता. हवेली) परिसरात आज (ता.१८) सायंकाळी ढगफुटी सदृश झालेल्या अतिवृष्टीने घरे, जनावरांचे गोठे यासह शेतातही मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून उभ्या पिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आज सायंकाळी चारच्या सुमारास प्रचंड ढग दाटून आले, त्यानंतर पिंपरी सांडस, न्हावी सांडस, शिरसवडी, बिवरी ते अष्टापूर परिसरात झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेकांची घरे, तसेच जनावरांच्या गोठ्यात पाणी घुसले तर अनेकांच्या शेतातही मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून उभ्या पिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
दिवाळीच्या तोंडावर प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरे, गोठे तसेच पिकांचे पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. कल्पना सुभाष जगताप व माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
......
03236