फुलगावात आरोग्य शिबिरात ३०० रुग्णांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलगावात आरोग्य शिबिरात 
३०० रुग्णांची तपासणी
फुलगावात आरोग्य शिबिरात ३०० रुग्णांची तपासणी

फुलगावात आरोग्य शिबिरात ३०० रुग्णांची तपासणी

sakal_logo
By

केसनंद, ता. २३ : सत्यसाई बाबांच्या अवतार प्रकट दिनानिमित्त फुलगाव येथे सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या वेळी ३०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

१२५ जणांना चष्मेवाटप व औषधे तसेच टीबी रोग ग्रस्त नऊ कुटुंबांना अमृत कलश वाटप केले. तर, ४७ कुपोषित बालकांना साई प्रोटीनफुडचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सिलिकॉन कॅम्प प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मनीष जैन, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, सभापती संजीवनी कापरे, मरकळचे माजी सरपंच राजाभाऊ लोखंडे, तुळापूरच्या सरपंच गुंफा इंगळे, आपटीच्या सरपंच सुनीता शिवले आदी उपस्थित होते. माजी सरपंच सुनील वागस्कर यांनी नियोजन व स्वागत केले.