श्री संभाजी महाराज समाधिस्थळ परिसर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवात उजळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री संभाजी महाराज समाधिस्थळ परिसर
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवात उजळला
श्री संभाजी महाराज समाधिस्थळ परिसर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवात उजळला

श्री संभाजी महाराज समाधिस्थळ परिसर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवात उजळला

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. ७ : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधिस्थळी दिवे व आकर्षक रोषणाईसह भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या हस्ते पहिला दिवा पेटवून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या वेळी पंचक्रोशीतील अनेक गावांतील शंभुभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती व वढू ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. या वेळी अनेक महिला भगिनी, धारकरी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अविनाश मरकळे, हरी शिवले, निखिल गव्हाणे, स्वप्नील शिवले, सोमनाथ शिवले आदी धारकऱ्यांनी परिश्रम घेतले. या वेळी समाधिस्थळी ‘लेझर शो’सह फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

या वेळी सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार, पोलिस हवालदार गरुड, पोलिस हवालदार संदीप कारंडे, पोलिस नाईक विकास मोरे, पोलिस पाटील जयसिंग भंडारे-पाटील, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भंडारे, माजी उपसरपंच रमाकांत शिवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.