आळंदी-तुळापूर-लोणीकंद रस्त्याचे आज भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी-तुळापूर-लोणीकंद
रस्त्याचे आज भूमिपूजन
आळंदी-तुळापूर-लोणीकंद रस्त्याचे आज भूमिपूजन

आळंदी-तुळापूर-लोणीकंद रस्त्याचे आज भूमिपूजन

sakal_logo
By

केसनंद, ता. १२ : आळंदी-मरकळ-तुळापूर-लोणीकंद राज्य मार्ग क्र. ११६ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, रविवारी (ता. १३) श्रीक्षेत्र तुळापूर येथे २२ कोटी खर्चाच्या या कामांचा प्रारंभ होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदिप कंद यांनी दिली.
आमदार पवार यांच्या हस्ते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ८.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार दिलीप मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र आळंदी आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ असलेल्या तुळापूर या धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना जोडणाऱ्या आळंदी-मरकळ-तुळापूर-लोणीकंद या रस्त्याचे काम रखडल्याने हा रस्ता खड्डे पडून अतिशय खराब झाल्याने सर्वांचीच गैरसोय होत होती. मात्र, आता या रस्त्याच्या सुधारणेचा मार्ग मोकळा झाल्याने राज्यभरातून येणाऱ्या शंभुक्तांनाही दिलासा मिळणार आहे.

श्रीक्षेत्र तुळापूर व आळंदी या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या या रस्त्याच्या किलोमीटर २१/४०० ते किलोमीटर ३१/८०० या टप्प्यासाठी २२ कोटींचा भरीव निधी मंजूर झाल्याने भाविकांसह जनतेला चांगला रस्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या रस्त्याचे काम अधिक मजबूत व चांगले होणार असल्याने स्थानिक जनता, प्रवासी तसेच वाहनचालकांनाही दिलासा मिळणार आहे.
- ॲड. अशोक पवार, आमदार