न्हावरेत ५० ऊसतोड कामगारांना मायेची ऊब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्हावरेत ५० ऊसतोड कामगारांना मायेची ऊब
न्हावरेत ५० ऊसतोड कामगारांना मायेची ऊब

न्हावरेत ५० ऊसतोड कामगारांना मायेची ऊब

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. २३ : न्हावरे (ता. शिरूर) येथे ५० ऊसतोड कामगारांना स्वेटर वाटप करण्यात आले. कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रथमच विराजमान झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष ऋषिराज अशोक पवार यांनी घेतलेल्या या उबदार निर्णयामुळे ऊसतोड कामगारांचे थंडीपासून संरक्षण झाल्याने त्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
कडाक्याच्या थंडीत ऊसतोड कामगारांचे थंडीपासून त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी अभिनंदनासाठी येणाऱ्यांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणण्याऐवजी ऊसतोड कामगारांसाठी उपयोगी स्वेटर आणण्याबाबत आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे वरिष्ठ सरचिटणीस प्रदीपभाऊ वसंतराव कंद यांच्या वतीने ५० ऊसतोड कामगारांना स्वेटर वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार अशोक पवार, अध्यक्ष ऋषिराज पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे वरिष्ठ सरचिटणीस कंद, कारखान्याचे संचालक, तसेच लोणीकंदचे माजी सरपंच श्रीमंततात्या झुरुंगे, तुषार झुरुंगे व इतर मान्यवर उपस्थित होते.