खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुनाच्या गुन्ह्यातील
दोन आरोपींना अटक
खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक

खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक

sakal_logo
By

केसनंद, ता. ५ : पिंपरी चिंचवड येथील खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरारी आरोपींना लोणीकंद (ता. हवेली )पोलिस तपास पथकाने जेरबंद केले. सूरज रामदास मोहिते (वय २१, रा. रामनगर, रामन चौक, पिंपरी-चिंचवड), करण भीमराव वंजारी (वय २०, रा. शरदनगर, चिखली, पिंपरी चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ नोव्हेंबर रोजी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाघोली येथील गोरे वस्ती-गायरान येथे राहण्यास आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथकाने या आरोपींना त्वरित जेरबंद केले. अधिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली. त्यांना पुढील तपासकामी पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले.