Wed, March 29, 2023

कोरेगाव, वढू येथे
शिंदे गटाचा जल्लोष
कोरेगाव, वढू येथे शिंदे गटाचा जल्लोष
Published on : 17 February 2023, 4:10 am
कोरेगाव भीमा, ता. १७ : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर कोरेगाव भीमा येथे वढू बुद्रुक चौकात शिंदे गटाच्या वतीने फटाके वाजवून व पेढे भरवून जल्लोष केला. यावेळी पुणे उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद, शिरूर तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, शिरूर तालुका सल्लागार अरविंद गव्हाणे, विभाग प्रमुख बापूसाहेब भांडवलकर, भाजप सरचिटणीस नितीन गव्हाणे, शहर प्रमुख संग्राम ढेरंगे, उपशहरप्रमुख सुरेश कले, अण्णा काशीद, स्वप्नील भोकरे, खंडू चकोर, प्रदीप काशीद आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.