Sat, June 10, 2023

पेरणे फाटा येथील
तरुणाची आत्महत्या
पेरणे फाटा येथील तरुणाची आत्महत्या
Published on : 8 March 2023, 2:09 am
कोरेगाव भीमा, ता. ८ : पुणे-नगर महामार्गालगत पेरणे फाटा (ता. हवेली) येथे एक तरुणाने भीमा नदीपुलालगत वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ८) सकाळी उघडकीस आली.
शंकर चौथीराम बारवासा (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. गेले अनेक वर्षापासून तो पेरणे फाटा येथे वास्तव्यास होता. त्याने व्यसनाधीनतेमुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. महामार्गालगतच आत्महत्या केल्याने ही घटना त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनचालक व प्रवाशांनी गर्दी केल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. लोणीकंद पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. पोलिस निरीक्षक राहुल कोळपे व सहकारी अधिक तपास करीत आहेत.