कोरेगावात पत्नीच्या पहिल्या पतीचा चारित्र्याच्या संशयावरून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरेगावात पत्नीच्या पहिल्या पतीचा
चारित्र्याच्या संशयावरून खून
कोरेगावात पत्नीच्या पहिल्या पतीचा चारित्र्याच्या संशयावरून खून

कोरेगावात पत्नीच्या पहिल्या पतीचा चारित्र्याच्या संशयावरून खून

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. १० : चारित्र्याचा संशय घेत पत्नीच्या पहिल्या पतीचा खून करून तब्बल दीड महिना पोलिस प्रशासनाला गुंगारा देणाऱ्या कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी बंगळूर येथे जेरबंद केले.
कोरेगाव भीमा येथे २१ जानेवारीला सकाळी सहाच्या सुमारास तुळजाभवानी नगर येथे रफीक अब्दुल पठाण यांच्या इमारतीत सुशांत अनिल करकरमर (वय ४६) यांचा धारदार हत्याराने वार करत खून केला होता. या गुन्ह्यात शिक्रापूर पोलिसांनी प्रदीप बलराम गराई (रा. पांचाल ता. सोनमुखी जि. बाकुडा, पश्‍चिम बंगाल; हल्ली रा. उबाळेनगर-वाघोली, ता. हवेली) यास जेरबंद केले.
खून झालेला करकरमर हा आरोपीच्या पत्नीचा पहिला पती असून, आरोपीने पत्नीचे चारित्र्याचा संशय घेऊन करकरमर याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा गुन्हा घडल्यानंतर आरोपी सुमारे दीड महिना पोलीसांना गुंगारा देत ओरिसा, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, चेन्नई, बंगलोर, कर्नाटकात ये-जा करीत होता. आरोपी एक जागेवर न थांबता वारंवार राहण्याचा ठिकाण बदलत असल्यामुळे त्याचा तपास लागत नव्हता. पोलिसांनी त्याच्या शोधाकरीता वेगवेगळी पथके नेमून आरोपीच्या हालचालींवर नजर ठेवत तांत्रिक विश्लेषणाद्वारे तो बंगलोर येथे असल्याचे माहिती मिळवली.
तपासकामी शिक्रापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्यासह पोलिस हवालदार अमोल दांडगे, पोलिस कॉन्स्टेबल निरन पिसाळ यांनी बंगलोर येथे जाऊन आरोपीचा गोपनीयरित्या शोध घेत सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार, पोलिस हवालदार अमोल दांडगे, पोलिस कॉन्स्टेबल नीरज पिसाळ, पोलिस नाईक शिवाजी चितारे यांनी केली.