
कोरेगाव भीमाच्या उपसरपंचपदी गणेश कांबळे
कोरेगाव भीमा, ता. १३ : कोरेगाव भीमाच्या (ता. शिरूर) उपसरपंचपदी गणेश कैलास कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदाच्या जागेसाठी सरपंच विक्रम गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी रतन दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणूक प्रक्रियेत कांबळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने उपसरपंचपदी कांबळे बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आली.
यावेळी प्रसंगी घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे, माजी सरपंच बाळासाहेब फडतरे, अशोक काका गव्हाणे, शहाजी गव्हाणे, शांताराम फडतरे, सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा फडतरे, केशवराव फडतरे, अनिकेत गव्हाणे, मनीषा गव्हाणे, अर्चना सुपेकर, दत्तात्रेय ढेरंगे, अरविंद गव्हाणे, कांतिलाल फडतरे, गणेश गव्हाणे, योगेश गव्हाणे आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
......
03501