शासकीय पूजा, मानवंदनेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय पूजा, मानवंदनेसह 
विविध कार्यक्रमांचे आयोजन
शासकीय पूजा, मानवंदनेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

शासकीय पूजा, मानवंदनेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. १९ : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या बलिदानस्मरण दिनी येत्या मंगळवारी (ता. २१) श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार असून शासकीय पूजा व मानवंदनेसह विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे.
वढू बुद्रुक ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने येत्या मंगळवारी (ता. २१) आयोजित कार्यक्रमात सकाळी ६ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, कवी कलश तसेच वीर शिवले यांच्या समाधीस महाभिषेक, तसेच सात वाजता मूक पदयात्रा, साडेआठ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा होईल. सकाळी ९ ते ११ कीर्तन तर साडेअकरा वाजता शंभूभक्तांच्या उपस्थितीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून पोलिसांतर्फे शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर सभा व पुरस्कार वितरण, त्यानंतर पुरंदर ते वढू पालखीचे आगमन व सायंकाळी ऐतिहासिक नाटकाचे आयोजन केल्याची माहिती सरपंच सारिका अंकुश शिवले व उपसरपंच राहुल ओव्हाळे यांनी दिली.